ढोरेगाव येथे ईद मिलन कार्यक्रम उत्साहात

गंगापुर प्रतिनिधी

ढोरेगाव हे गाव हिंदु-मुस्लिम एकतेचे कायम प्रतीक राहिले असून गावामध्ये हिंदु-मुस्लिम धर्मियांचे नागरीक गुण्यागोविंदाने राहतात.आपल्या पूर्वजांनी जपलेला बंधुभावाचा वारसा पुढे चालू ठेवत,हाजी करीम पटेल,हाजी सुलेमान पटेल,सरपंच अय्युब पटेल,हाजी समद पटेल,हाजी अब्दुल पटेल,याच्या वतीने भव्य ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माच्या नागरिकांसाठी भव्य असे शीर खुर्मा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

ईदनिमित्त परिसरातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या नागरिकांनी एकत्र येऊन आपसात हितगुज साधावे तसेच सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपला जावा तसेच ईद निमित्ताने समाजातील संबंध गोड करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला.यावेळी गंगापुर, ढोरेगाव, सोलेगाव, पुरी, नंद्राबाद, सावखेडा,
महालक्ष्मी खेडा, दहेगाव, जळगाव, पेंडापूर,
शहापूर, सय्यदपुर, पिंपळवाडी परिसरातील सरपंच उपसरपंच सह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,
वैदयकिय, शासकीय अधिकारी, व्यापारी, आदी क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला व या सुंदर उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी कदीर पटेल, शकील पटेल, मुख्तार पटेल, खलील पटेल, मुस्ताक पटेल, जमील पटेल,अल्ताफ पटेल, अशपाक पटेल, जैद पटेल, अरबाज पटेल, अशरफ पटेल, मुजम्मिल पटेल, कैफ पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!