गंगापूर कृउबा निवडणूकीत आमदार प्रशांत बंब यांच्याहाती सत्ता तर डोणगावकर यांचा धुव्वा


गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेला बहुमत मिळाले तर आघाडीत बिघाडी झाल्यामुळे त्यांना पाच जागा मिळाल्याने बहुमतापासुन कोसोदुर राहण्याची वेळ आली असून काॅग्रेसला खातेही खोलता आले नाही.तर दोन उमेदवारांना सारखे मतदान मिळाल्याने चिठ्ठी टाकून मतदान घेण्यात आले.
गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी ३० एप्रिल रोजी सकाळी ८ ते ४ यावेळेत गंगापूर व वाळुज येथे मतदान झाले मतदानानंतर एका तासानंतर गंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेत मतमोजणीला सुरवात झाली रात्री ९ वाजता निकाल घोषित करण्यात आला आमदार प्रशांत बंब व आमदार रमेश बोरणारे यांच्या पुरस्कृत भाजप शिवसेना पॅनलला तेरा जागा मिळाल्या तर उध्दव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसला पाच जागांवर समाधान मानावे लागले
या निवडणुकीत भाजप- शिवसेना शिंदे गटातून विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये ग्रामपंचायत मतदार संघातून दिपक हरेराम बडे (४८५) सुशीला बाई राजगीरे (३२९), सचिन काकडे (४९७), नवनाथ सुराशे (४६२) ,सोसायटी मतदारसंघातून रामेश्वर त्रिंबक गवळी(३३४), भाउसाहेब जयराम पदार (३१५), भारत लक्ष्मणराव पाटील (३१५), उमेश अंबादास बाराहाते (३१३), अर्चना कृष्णा सुकासे (३७४), सतीश रामचंद्र डेडवाल(३५८), हे विजयी झाले तर भाजप शिवसेनेचे दत्तात्रय शेषेराव दुबिले(३१०) व राष्ट्रवादी काँग्रेस व उध्दव ठाकरे शिवसेनेचे लक्ष्मण सांगळे (३१०) समसमांन मते मिळाल्याने दोघांच्या नांवाने चिठ्ठ्या टाकून लहान मुलांच्या हाताने चिठ्ठी काढली असता दुबीले हे विजयी झाले.
आमदार सतीश चव्हाण व कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या राष्ट्रवादी- शिवसेना ठाकरे पुरस्कृत गटाचा धुव्वा उडाला यांना फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले निवडून आलेल्या मध्ये डॉ. ज्ञानेश्वर रंगनाथ नीळ(३३७), सुवर्णाताई संजय जाधव(३४८), नारायण बाराहाते(३१४), दिपक वालचंद जाधव(३४३),तर हमाल तोलारी मतदार संघातून तौफिक पठाण (७५) यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी बलराम नवथर यांनी निवडणूक निकाल घोषित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!