गौतमी पाटीलच्या लग्नाचा बार उडणार, चाहत्यांना धक्का! कोण आहे भावी नवरदेव?

बारामती (प्रतिनिधी) गौतमी पाटील सबसे कातील, गौतमी पाटील…असं म्हणत आपल्या अदाकारीनं महाराष्ट्रातल्या तरूणाईला घायाळ करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते.

महाराष्ट्रातली लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गौतमीने स्वत: तिच्या लग्नाची घोषणा केली आहे.

सर्वांना ती तिच्या लग्नाचे निमंत्रण देणार आहे. गौतमीच्या लग्नाच्या बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. गौतमी कुणाशी आणि कधी लग्न करणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे.

गौतमी पाटलाच्या लावणीची संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पडली आहे. गौतमी पाटीलचा शो त्याठिकाणी प्रचंड गर्दी असंच समीकरण जिकडे तिकडे पाहायला मिळते.

गौतमची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणतीही रिस्क घ्यायला तयार होतात. गौतमीचा डान्स पाहण्यासाठी चाहते कधी झाडावर चढतात तर कधी छतावर तर पत्र्याच्या शेडवर. अनेकांच्या मनावर राज्य करणारी गौतमी आता लग्न बंधनात अडकणार आहे.

माझ्या लग्नात पण गोंधळ घाला – गौतमी पाटील

मी लवकर विवाह करणार असून अनुरुप वर मिळाला की सर्वांना निमंत्रण देणार आहे. जो काही धुडगूस घालायचा तो घाला असं सांगत गौतमीने पुन्हा एकदा लग्नाबाबत भाष्य केलं आहे. बारामती येथे कार्यक्रमानंतर गौतमी पाटीलने पत्रकारांशी बोलताना लग्नाबद्दल सांगितले.

गौतमीला कसा नवरा पाहिजे?

गौतमी 25 वर्षांची आहे. तिला देखील इतर मुलींप्रमाणे लग्न करुन सुखाचा संसार थाटायचा आहे. ती नेहमी लग्न करण्याची इच्छा वक्त करते. येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार गौतमीला पाहिजे. मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा या कशाची गरज नाही फक्त कायम सोबत राहणारा जोडीदार पाहिजे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने तिला कशा प्रकारचा जोडीदार पाहिजे याबाबतच्या आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या.

कधी पुरुषांसह थेट संबध आला नाही – गौतमी पाटील

युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने तिच्या व्यैयक्तीक आयुष्याबाबत देखील अनेक गोष्टींवर भाष्य केले होते. लहान असतानाच वडिलांचे निधन झाले. ना वडील ना भाऊ, ना नातेवाईक यामुळे घरात कुणीच पुरुष नव्हता.

माझं शालेय शिक्षण मुलींच्या शाळेत झालं यामुळे माझा कधीच कोणत्या पुरुषासोबत वैयक्तिक संबंध आलेला नाही असे गौतमीने या मुलखतीत सांगितले होते. घरातल्या जबाबदाऱ्यांचा अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असायला हवा अशी अपेक्षा गौतमीने व्यक्त केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!