अदिती हिवाळेचा आय.आय.एम. प्रवेशात तिहेरी डंका

गंगापूर | प्रतिनिधी

आय.आय.एम. प्रवेशात अदिती राजेश हिवाळे हिने तिहेरी डंका वाजवत एकाच वेळी लखनौ,रोहतक,शिलॉंग आय.आय.एम. प्रवेशासाठी निवड झाली आहे.
जगातील अग्रगण्य संस्थांमध्ये एक असलेली आणि व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी लखनौ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट म्हणजे आय.आय.एम लखनौ प्रवेशपर्व परिक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करून आदिती हिवाळे हिने प्रवेश मिळवला आहे.अभिमानास्पद बाब म्हणजे एकाच वेळी लखनौ,रोहतक,शिलॉंग आय.आय.एम. प्रवेशासाठी निवड झाली आहे.

एमबीए हा दोन वर्षाचा पाठ्यक्रम असून उत्तरप्रदेश राज्यातील लखनौ शहरात असलेली व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणा-या या संस्थेत प्रवेश मिळवून आदिती हिवाळेने गळनिंब ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर गावाचे नावलौकिक केले आहे.लखनों मधील आय.आय.एम.ची स्थापना १९६१ मध्ये झाली असून अहमदाबाद,कोलकात्यातील आय.आय.एम. नंतर स्थापन होणारे भारतातील तिसरे आय.आय.एम आहे. मॅनेजमेन्टचे प्रशिक्षण देणाऱ्या जगातील अग्रगण्य संस्थांमध्ये गणना असलेल्या या संस्थेत प्रवेश प्राप्त करणारी आदिती ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष व गंगापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन राजेश केशवराव हिवाळे व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसेगाव येथील सहशिक्षिका गीतांजली साळुंके – हिवाळे यांची सुकन्या आहे.
कठोर परिश्रम व चिकाटीने अभ्यास करून पहिल्या प्रयत्नात प्रवेश प्राप्त करणाऱ्या अदितीने आपले शालेय शिक्षण मॉडर्न इंग्लिश स्कूल गंगापूर,टेंडर केअर होम छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण करून बारावी सद्गुरु किसनगिरी बाबा महाविद्यालय जळके तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथून पूर्ण करत सद्यस्थितीत भारती विद्यापीठ कात्रज,पुणे येथे बायोटेक विषयाच्या अंतिम सत्रात प्रवेशित आहे.आपल्या यशाचं श्रेय दृढ़निश्चय, परिश्रम सोबतच सर्व कुटुंबीयांना देत आहे.घवघवीत यश मिळवणाऱ्या आदीतीचे सर्वत्र अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!