३३ वर्षांनी भेटले मित्र जुन्या आठवणींनी उजाळा. न्यु हायस्कूल जामगांव १९९० च्या बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात


गंगापूर (प्रतिनिधी) शाळेचे शिक्षण झाल्यानंतर ३३ वर्ष झाली. इतक्या वर्षांत प्रत्येकजण आपापल्या संसार, उद्योग, व्यापार, नोकरीत गुंतलेला. प्रत्येकाचे ठिकाणही वेगळे, मात्र एकत्र येण्याची इच्छा असेल तर एवढ्या वर्षांनीही जुने मित्र मैत्रिणी भेटू शकतात, हे साध्य केले जामगांव येथील न्यू हायस्कूलमधील १९९० मधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी. या सर्वांना एकत्र आणण्याचे काम सुनील बोराटे यांनी करून दाखवले.
निमित्त होते या बॅचमधील बाबासाहेब मंडलिक यांना राज्यशासनाकडून मिळालेल्या आदर्श अभियंता पुरस्काराचे ! जामगाव येथील याच बॅचचे विद्यार्थी सुनिल बोराटे यांनी हा कार्यक्रम त्यांच्या जामगाव येथील निवासस्थानी १ आक्टोंबर रोजी आयोजित केला होता. तेहतीस वर्षानंतर एकत्रित आल्यामुळे जुन्या आठवणीनां उजाळा मिळाला. या दिवशी याच बॅचमधील बाबासाहेब मंडलिक, हंसराज काळे यांचा तसेच गावातील सुनिल ठाकूर, दिपक ठोंबरे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी उमेश बाराहाते यांची कृषी उत्पन्न बाजार समीती गंगापूरच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल व याच बॅचचे नंदु परदेशी यांची गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी माजी सभापती विनोद काळे, गंगापूर साखर कारखान्याचे माजी संचालक देविदास वाघ, डॉ गोरख तुपलोंढे, भारत तुपलोंढे, संजय तुपलोंढे, शिवबा संघटनेचे प्रदेश संपर्क प्रमुख देविदास पाठे, चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटी, कायगाव संजय गायकवाड पाटील, गजानन गायकवाड वर्गमित्र डॉ. दिलीप वाकडे, पत्रकार प्रमोद जाधव, प्रताप नरोडे, दत्ता काळे,बापू भडके, आबासाहेब साळुंके तसेच राजेंद्र माने, त्रिंबक मंडलिक, कोंडीराम बोराटे, सोमवंशी, सुभाष पा माने, आदर्श शेतकरी उमेश बंग, नितीन तांबे, सोमनाथ तागड, प्रकाश रोडगे, भगवान ठवाळ, अशोक पगारे,पंढरीनाथ जगदाळे,सुदाम काळे, शाईनाथ इष्टके, अरुण मगर, ज्ञानेश्वर माने, लक्ष्मण शेळके, ज्ञानेश्वर मगर, संजय मगर, ईश्वर पंडीत, नितीन काळे, धनंजय काळे, किशोर गवळी, दत्ता रोडगे इ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मयुरी बोराटे हीने केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदित्य मंडलिक, संग्राम बोराटे, स्मृती जगदाळे, निकीता बोराटे यांनी परीश्रम घेतले. सुनिल बोराटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!