संभाजीनगर केले. हे जनतेला मान्य आहे परंतु पवारांना मान्य नाही…गंगापूर उपसा सिंचन योजनेला मान्यता  बंब यांच्यामुळेच दिली. प्रशांत बंब खऱ्या अर्थाने योजनासम्राट.” देवेंद्र फडणवीस

संभाजीनगर केले. हे जनतेला मान्य आहे परंतु पवारांना मान्य नाही…
गंगापूर उपसा सिंचन योजनेला मान्यता  बंब यांच्यामुळेच दिली. प्रशांत बंब खऱ्या अर्थाने योजनसम्राट.” देवेंद्र फडणवीस
गंगापूर (प्रतिनिधी)गंगापूर येथे ३० जून‎ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎ यांच्या हस्ते मराठवाडा वॉटरग्रीड या‎ महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन‎ करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे . केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.डॉ भागवत कराड,सहकार मंत्री मा. अतुल सावे आमदार प्रशांत बंब यांची प्रमुख उपस्थिती होती.

संभाजीनगर केले. हे जनतेला मान्य आहे परंतु पवारांना मान्य नाही

एका वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आपल्या आशीर्वादाने परिवर्तन झाले आणि राज्यात आपलं सरकार स्थापन झालं. छत्रपतींच्या पाऊलांवर आणि मार्गावर चालणारे सरकार सत्तेत आले. वेगाने कामे सुरु झाले. त्यात औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले. हे जनतेला मान्य आहे परंतु पवारांना मान्य नाही. ते म्हणाले मी औरंगाबादचं म्हणणार. मात्र पवारांनी काहीही म्हटलं तरी संभाजी महाराजांचे योगदान आणि बलिदान कुणीही विसरू शकणार नाही आणि आमच्या मनातून काढू शकणार नाही.” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावुन सांगितलं आहे.

“आमदार प्रशांत बंब ज्या योजनेचा पाठपुरावा करत होते, ज्यामुळे गंगापूरचे चित्र पालटू शकेल. या योजनेमुळे ३० हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. परवाच्या कॅबिनेटमध्ये गंगापूर उपसा सिंचन योजना मान्यता दिली असून त्याचा निर्णय घेऊनच मी इथे आलो आहे. लवकरच या योजनेसाठी टेंडर काढण्यात येणार असून येत्या दिवाळीत योजनेच्या भूमिपूजनासाठी आम्ही येऊ. या योजनेसाठी पाठपुरावा केवळ प्रशांत बंब यांनी केला, त्यांच्यामुळेच योजना येऊ शकली. प्रशांत बंब खऱ्या अर्थाने योजनसम्राट.” असं फडणवीस म्हणाले.

ठाकरेंवर निशाणा साधताना पुढे ते म्हणाले, “अडीच वर्षात एकही योजनेला सुधारित मान्यता देण्यात आली नाही, आम्ही वर्षभरात ३५ योजनांना मान्यता दिली. उर्वरित योजनांनाही लवकरच मान्यता देणार. मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा मुद्दा अडीच वर्षांच्या सरकारने पाडला, मात्र केंद्राने या योजनेसाठी ३० हजार कोटींचा निधी दिला.” असं फडणवीस म्हणाले.
मोदींनी महाराष्ट्राला काय दिलं हे सांगताना फडणवीस म्हणाले, “जनतेला २५ लाख घरे दिली, ७१ लाख गरिबांना आरोग्य सेवा दिली. कोव्हिडची लस मोदींमुळेच मिळाली. लाखो कोटींची पायाभूत सुविधांची उभारणी मोदींनी केली, मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिलं. मोदीजी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार देत होते आता त्याला जोड देत राज्य सरकारही शेतकऱ्यांना सहा हजार वार्षिक देणार असून शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपये महाराष्ट्रात मिळणार आहेत.” अशी माहिती फडणवीसांनी दिली.


फडणवीसांचे शेतकऱ्यांना आवाहन!
पुरेसा ओलावा आल्याशिवाय पेरणी करू नका, पाऊस पडला नाही आणि पेरणी केली तर अपुऱ्या ओलाव्यापायी दुबार पेरणीचे संकट येईल. असं आवाहन फडणवीसांनी शेतकऱ्यांना केलं आहे. विठ्ठलाकडे पाऊस व्हावा अशी विनंती केली आहे. शेतकऱ्यांना मोफत पीकविमा देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना बाराही महिने बारा तासाची वीज उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरु असून बारा तास वीजपुरवठा शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार अशा अनेक गोष्टी आपलं सरकार देत आहे. मोदी आवास योजनेच्या नातंर्गत ओबोसी समाजाला दहा लाख घरे देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

मराठवाडा सातत्याने दुष्काळात
पश्चिमी वाहिन्यांमधून वाया जाणारे पाणी मराठवाड्यात आणले जावी अशी विनंती होती, आम्ही त्याचा जीआर काढला, पण अडीच वर्षात त्याला ठेंगा दाखवण्यात आला. त्याचे काम आम्ही करणार असून पश्चिमी वाहिन्यांमधून वाया जाणारे पाणी इकडे आणून पाणीदार मराठवाडा करण्याचे स्वप्न पूर्ण करू. असं फडणवीस म्हणाले आहेत. मोदींच्या सोबत डबल इंजिन सरकार आहे, मोदींच्या नेतृत्वात देश वेगाने पुढे जातोय. देशात २०१४ पूर्वी अतितीव्र गरिबीची संख्या २५ टक्के होती, आता ती एका टक्क्यावर आली आहे. असे जागतिक अहवाल सांगतात. देशाला अकराव्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर आणून मोदींनी दाखवलं. पंधरा हजार कोटींचे प्रकल्प परवा एका कम्युनिटी बैठकीत औरंगाबादसाठी आणण्याला मंजुरी मिळाली आहे. अशी माहितीही फडणवीसांनी दिली.
जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडे, तहसीलदार सतीश सोनी,पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, पुजा नांगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, प्रभारी पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, सपोनी शाईनाथ गिते, सपोनी अशोक चौरे, प्रल्हाद मुंढे, पोलिस उपनिरीक्षक शकील शेख, दिपक औटी, अझर शेख, राजेंद्र सावंत, स्थानिक गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक आदींनी नियोजन करून चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!