शेवगाव हादरलं ; दरोड्यात व्यापारी कुटुंबातील दिर भावजई ठार तर एक महिला गंभीर जखमी

शेवगाव हादरलं ; दरोड्यात व्यापारी कुटुंबातील दिर भावजई ठार तर एक महिला गंभीर जखमी
अहमदनगर (प्रतिनिधी) शहरातील भर वस्तीत व्यापाऱ्यांच्या घरावर दरोडा टाकला दरोडेखोरांनी डोक्यात लोखंडी सळईने वार केल्याने यात दिर भावजई ठार तर एक गंभीर जखमी

 शेवगांव शहर आज २३ जुन (शुक्रवार) पहाटे दरोड्यानं हादरलं. भर वस्तीत मारवाडी गल्लीत हा प्रकार घडला. यात दरोडेखोरांच्या मारहाणीत दोन जणांचा जागीच मृत्यु झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

शेवगाव शहरातील बाजारपेठेमध्ये राहत्या घरी रात्री तीन ते चारच्या दरम्यान दरोडा पडला. भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगा किशन बलदवा (वय 55) यांच्या घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी सळईच्या सहाय्याने वार केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

दरोडेखोरांनी गोपीकिशन गंगाकिशन बलदवा व त्यांच्या मोठ्या वहिनी पुष्पा हरिकिशन बलवा (वय 65) यांना निर्घृण मारहाण केल्यामुळे या मारहाणीत दोघांचा जागेवर मृत्यू झाला. त्याचबरोबर सुनिता गोपीकिशन बलदवा या घटनेमध्ये जखमी झाल्या आहेत. त्यांची परिस्थिती गंभीर असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत

या घटनेची माहिती कळल्यानंतर घटनास्थळी व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी व्यापाऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती घेतल्यानंतर ते म्हणाले, “शेवगाव शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या भागांमध्ये दरोडा पडणे आणि त्यात दोन जणांचा मृत्यू होणे ही मोठी गंभीर घटना आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेचा तातडीने तपास करावा आणि आरोपींचा शोध घ्यावा,” शहरांमध्ये या पद्धतीने गंभीर गुन्हे होणे होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कामावर मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!