गंगापूर (प्रतिनिधी) लासुर स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक परिसरात मोठ्या प्रमाणत अतिक्रमण करण्यात आले असून मुळ स्मारकाची जागा हि कमी दिसत आहे त्यामुळे स्मारकाच्या सुशोभीकरनाच्या कामात अडथळा निर्माण होतोय ग्रामपंचायतच्या रेकॉर्ड नुसार १०० × १२० अशी आहे पण सद्य स्थिती मध्ये ही जागा कमी भरत आहे या झालेल्या अतिक्रमणामुळे समस्त शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत येत्या चार दिवसात करण्यात आलेले अतिक्रमण हटवून रेकॉर्ड नुसार सर्व जागा मोकळी करून द्यावी अशी मागणी सावंगी ग्रुप ग्राम ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. नसता समस्त शिवप्रेमींच्या वतीने लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल निवेदन देतेवेळी नितीन कांजुणे,अमोल शिरसाठ, मनोज सुराशे,विजय भाले,अजय साखळे, अशोक खिल्लारे, मोहसीन बागवान, संदीप आमराव,गणेश आघाडे, विजय जगताप,आदेश रणयेवले, प्रतीक खंडेलवाल, मयुर शिरसाठ, विनोद शिरसाठ, आकाश भगुरे, सचिन डिके,अमोल काकडे, नदीम शेख आदी उपस्थित होते..
संबंधित पोस्ट
सर्वोत्कृष्ट महिला पोलीस अंमलदार पुरस्काराने शिल्लेगांव पोलिस स्टेशनच्या पोलिस अंमलदार जकीया शेख सन्मानित
गंगापूर (प्रतिनिधी) दिव्य मराठी समूहाकडून आयोजित पोलिस सन्मान २०२४ पुरस्कार शिल्लेगाव पोलिस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अंमलदार जाकिया शेख यांना”छत्रपती संभाजी नगर ग्रामीण जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट…
अज्ञात वाहनाच्या धडकेत बैलपोळ्याची खरेदी करून परतणाऱ्या शेतकऱ्यांवर काळाचा घाला…….मोटारसायकलस्वार शेतकरी ठार तर एक गंभीर जखमी.
अज्ञात वाहनाच्या धडकेत बैलपोळ्याची खरेदी करून परतणाऱ्या शेतकऱ्यांवर काळाचा घाला……मोटारसायकलस्वार शेतकरी ठार तर एक गंभीर जखमी. गंगापूर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरील कायगांव टोका येथील…
आमदार प्रशांत बंब यांची १६ आक्टोंबरला आमसभा
गंगापूर (प्रतिनिधी) आमदार प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली १६ आक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता येथील शिवकृपा मंगल कार्यालयात आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे.पंचायत समिती गंगापूरची २०२३-२४…