डॉ. हेडगेवार रुग्णालयात भारतीय अवयवदान दिवस साजरा…*अवयव दानाचे महत्व नाटीकेद्वारे पटवून दिले..

डॉ. हेडगेवार रुग्णालयात भारतीय अवयवदान दिवस साजरा…अवयव दानाचे महत्व नाटीकेद्वारे पटवून दिले..

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) अवयवदान ही जटील आणि कठीण प्रक्रिया नाही. आपल्याजवळ जे जास्तीचे आहे ते आपल्या जिवंतपणी किंवा मृत्यु पश्यात इतरांना देवून त्याचे जीवन सुखी करावे ही आपली संस्कृती आहे. अवयवदान हे एक प्रकारचे दान असून, दानाला अत्यंत महत्व आहे. त्यामुळे ‘दान द्या जीवन वाचवा’ असे आवाहन डॉ. महेश देशपांडे व डॉ. निरज इनामदार यांनी केले.

आज हेडगेवार रुग्णालयात आझादी की ७५ वर्षे अनुसरुन अंगदान महोत्सव व त्यानिमित्त भारतीय अवयवदान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ.पिनाकीन
पुजारी, डॉ.अविनाश बुचे उपस्थित होते. ३ ऑगस्ट भारतीय अवयवदान दिनानिमित्त रुग्णालयामार्फत भितीचित्रे, प्रदर्शनी आणि पथनाट्ये सादर करण्यात आले.

याप्रसंगी अवयव प्रत्यारोपन समन्वयक.अनिल घोगरे व .अशोक फटांगडे यांनी उपस्थितांना अवयवदानासंबंधी माहितीपत्रक वाटप केले व अवयवदानाचे प्रतिज्ञापत्र भरुन घेतले . रुग्णालयाच्या मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजश्री रत्नपारखे यांनी रुग्णालयातील कर्मचारी व उपस्थितांना अवयवदाना संबंधी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!