गंगापूर लासूर नाक्यावर विद्युत पोलची तार पडल्याने पाचटाने भरलेली ट्राॅली भर रस्त्यावर पेटली. मोठे नुकसान टळले

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर लासूर स्टेशन रोडवरील बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर पाचटाने भरलेले ट्रॅक्टर जात असताना पोलची तार ट्राॅलीवर पडल्याने पाचटाला आग लागली वेळेवर खाजगी टॅंकरने पाणी मारल्याने पुढील अनर्थ टळला.या घटनेमुळे अर्धातास रहदारी ठप्प झाली होती.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कायगांव रोडकडुन ऊसाच्या पाचटाचे दोन ट्रॉली गठ्ठे भरून ट्रॅक्टर क्रमांक एम एच १६ ए व्ही ९३८० हा २७ मार्च रोजी सव्वा पाच वाजेदरम्यान महाराणा प्रताप चौकातुन लासूर स्टेशनकडे जात असताना बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर असलेल्या ट्रान्सफॉर्मर (डिपी) खाली आले असता झाडाची फांदी तारेवर पडल्याने तार तुटून ट्राॅलीवर पडल्याने स्पाक्रींग होवुन ट्राॅलीमधील पाचटाने पेट घेतला चालकाने दोन्ही ट्राॅलीला अलग केले त्यामुळे एक ट्राॅलीमधील पाचटाने पेट घेतला स्थानिक नागरिकांनी खाजगी टॅंकरने पाणी मारुन आग विझवली ही आग आटोक्यात आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता या रोडवरील रहदारी काही काळ ठप्प झाली होती.
(अग्निशमन दलाची गाडी बनली शोभेची वस्तू)
अग्निशमन दलाचीगाडी किरकोळ कारणावरून बंद पडलेली असुन तिची दुरुस्ती करून सुस्थितीत ठेवणे आवश्यक असताना नगर परिषदचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने शहरात आगीच्या घटनाघडुन मोठी हानी होवु शकते.ही गाडी त्वरित दुरुस्त करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!