गंगापूर येथील श्री मुक्तानंद महाविद्यालयच्या प्राचार्या डॉ. सी. एस.पाटील यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड.

श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूरच्या प्राचार्या डॉ. सी. एस.पाटील यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड.

गंगापूर (प्रतिनिधी)डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कुलपती व महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.रमेश बैस यांनी श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूरच्या प्राचार्या प्रोफेसर डॉ.श्रीमती सी. एस.पाटील यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार कुलपती पती यांच्या वतीने आठ प्राचार्यांची नियुक्ती करण्यात येते. त्यामधून प्रोफेसर प्राचार्य डॉ. श्रीमती सी. एस. पाटील यांची नियुक्ती झालेली आहे ही महाविद्यालयाच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब आहे. विद्या परिषदेवर नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांची वेळोवेळी विद्यापीठ पातळीवर बैठका होत असतात व त्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात त्या दृष्टीने ही एक महत्त्वाची बाब आहे.

प्राचार्या डॉ. सी. एस .पाटील ह्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गंगापूर येथील श्री मुक्तानंद महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याच नेतृत्वखाली श्री मुक्तानंद महाविद्यालयाने नॅक मूल्यांकनात 3.56 CGPA मिळवून A++ दर्जा प्राप्त केला आहे. सौ पाटील या आधी विद्यापीठ पातळीवर अनेक विविध समित्यांवर मोलाचे कार्य केलेले आहे. डॉ. पाटील ह्या देवगिरी महाविद्यालयांमध्ये रसायन शस्त्राची प्राध्यापिका, विभाग प्रमुख व उपप्राचार्य म्हणून 35 वर्षे प्रदीर्घ सेवा दिलेली आहे. त्या एक कुशल संशोधन मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विद्यार्थ्यांनी पीएचडी डिग्री प्राप्त केलेली आहे त्यांची एकूण 70 रिसर्च पेपर व आठ पुस्तके प्रकाशित आहेत. यांच्या निवडीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय श्री प्रमोद येवले,मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार .प्रकाशदादा सोळंके, सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ॲड.लक्ष्मणराव मनाळ तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य संजय जाधव, प्रशांत माने, विश्वजीत चव्हाण, संतोष काळवणे इकबाल सिद्दिकी, रमेश निरफळ, अमोल वरकड, ॲड.कृष्णा ठोंबरे तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.वैशाली बागुल, उपप्राचार्य डॉ.बी. टी.पवार, उपप्राचार्य प्रा.विशाल साबणे, पर्यवेक्षक डॉ. हरिराम सातपुते, प्रबंधक भास्कर सुरवसे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी व विविध स्तरावरील मित्र परिवारांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!