कान्होबावाडीतील शेतकऱ्यांनो सावधान ऊसात घुसला बिबट्या…..परिसरात भीतीचे वातावरण

कान्होबावाडीतील शेतकऱ्यांनो सावधान ऊसात घुसला बिबट्या
परिसरात भीतीचे वातावरण.

मुलांना शाळेत पाठवायचे कसे पालकांचा सवाल

गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर तालुक्यातील कानोबावाडी शिवारामध्ये बिबट्याचे दर्शन;परिसरात भीतीचे वातावरण.
मुलांना शाळेत पाठवायचे कसे पालकांचा सवाल

गंगापूर तालुक्यातील कानोबावाडी शिवारात बिबट्या दिसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे कानोबावाडी येथील शेतकरी मनोहर शिंदे यांच्या गट क्रमांक २९ मध्ये १७ जुलै रोजी रात्री त्यांना बिबट्या त्यांच्या घराजवळ दिसून आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की शेतकरी मनोहर शिंदे यांच्या घराजवळ असलेल्या शेडमध्ये बकऱ्या बांधल्या होत्या रात्री दहा वाजे दरम्यान अचानक बकऱ्या ओरडण्याचा आवाज आल्याने मनोहर शिंदे घराबाहेर आले बाहेर येताच त्यांना शेडजवळ बिबट्या दिसला घाबरलेले शेतकरी मनोहर शिंदे यांनी घराचा दरवाजा बंद करून आजूबाजूच्या शेकऱ्यांना फोन केला.दहा ते पंधरा शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आल्याने ट्रॅक्टरच्या लाईटच्या उजेडाने बिबट्या उसाच्या शेतात निघून गेला. संध्या शेतकऱ्यांची शेती मशागतीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बिबट्याच्या वावराने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.कानोबावाडी येथील शाळेत शेतवस्तीवरील मुले मोठ्या संख्येने शाळेत जातात .परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने शाळेत जाणाऱ्या मुलांना शाळेत पाठवायचे कसे असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. वनविभागाने या बिबट्यास तात्काळ जेरबंद करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर

गंगापूर तालुक्यात मागील काही दिवसापासून अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर असून बिबट्याने शेतकऱ्याच्या पशुधनावर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील आगरवाडगाव धनगरपट्टी भिवधानोरा शिवारात वनविभागाने पिंजरा लावूनही बिबट्यास जेरबंद करण्यास वनविभागाला अपयश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!