आमदार प्रशांत बंब यांच्या विशेष प्रयत्नाने गंगापूर- खुलताबादला ७१ कोटींचा निधी प्राप्त


गंगापुर (प्रतिनीधी) नागपूरला सुरू असलेल्या अधिवेशनाच्या पहिल्याच
मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मतदारसंघातील
विकासकामांसाठी ७१ कोटी ५७ लाख ३७ हजार एवढा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे.यासाठी आमदार प्रशांत बंब यांनी पाठपुरावा केला.

या निधीतून रेल्वे पूल,रस्त्यावरील लहान पूल व प्रशस्त रस्ते अशी विकास कामे केली जाणार आहेत. मंजूर कामात लासूर स्टेशन येथे रेल्वे उड्डाण पूल (१७ कोटी ३९ लाख), देवगाव, गंगापूर लासूर रस्त्यावर गट क्र. ३४ लासूर स्टेशन येथे प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाकरिता पोच रस्त्याची भुसंपादनासह दुरुस्ती करणे (१० कोटी),
काटेपिंपळगाव लासूर डोणगाव दिवशी रस्ता दुरुस्ती (७०
लाख),वैरागड,बाभूळगाव,डोणगाव टाकळी जांभाळा रस्ता दुरुस्ती ( ७ कोटी ५० लाख) वाळूज-कमळापूर-
घाणेगाव-नारायणपूर-कासोडा रस्ता (१०काँक्रिटीकरण
करणे कोटी),वाळूज-रामराई-इटावा एकलहेरा सिमेंट
काँक्रिट रस्त्याचे बांधकाम पूल (३५० लाख), ढोरेगाव-सावखेडा-वाळूज-लांझी रस्ता दुरुस्ती (९ कोटी),
गाढेपिंपळगाव, वाहेगाव,मांजरी,संजरपूर रस्ता दुरुस्ती (४ कोटी ८० लाख),गाढेपिंपळगाव,वाहेगाव,मांजरी, संजरपूर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम (२ कोटी),

खुलताबाद-लामणगाव-टाकळी राजेराय रस्ता डांबरीकरण व पुलाचे बांधकाम (३ कोटी ४४ लाख ५२ हजार), हर्सल जटवाडा रस्ता रुंदीकरणासह दुरुस्ती (१ कोटी),
खुलताबाद तालुक्यातील ताजनापूर,शिरोडी रस्ता दुरुस्ती (१ कोटी),खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी
शिरोडी रस्ता दुरुस्ती (५० लाख) या कामांचा यात समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!