आत्ताची भितीदायक बातमी…बक-याच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याला शेतकऱ्यांनी कोंडले बिबट्याने बकरीवर मारला तावबघ्यांची गर्दी वाढली.

आत्ताची भितीदायक बातमी…
बक-याच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याला शेतकऱ्यांनी कोंडले बिबट्याने बकरीवर मारला ताव
बघ्यांची गर्दी वाढली.


गंगापूर (प्रतिनिधी)बक-याच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याने एका बकरीचा फडशा पाडुन ताव मारीत असताना शेतकऱ्यांनी गोठ्याचे दार बंद करून कुलुप ठोकल्यामुळे बिबट्याला बघण्यासाठी शेतकरी व नागरीकांनी मोठी गर्दी केली आहे
शिंगी पिंपरी शिवारात २८ जुलै रोजी रात्री अकरा वाजता बिबट्या
राऊसाहेब पवार याच्या वस्तीवर कुत्र्याला धरले असता वस्तीवरील शेतकऱ्यांनी आरडा ओरड केल्यावर आवाजामुळे बिबट्या ओढ्याकडे पाळला व तो नरहरी राझंणगाव शिवारातील सुकदेव म्हस्के यांच्या शेतात बक-यासाठी बांधलेल्या जाळीच्या गोठ्यात उघड्या असलेल्या दरवाजातुन घुसला असता बक-याच्या आवाजाने म्हस्के यांनी बिबट्याला पाहिले असता त्यांनी गोठ्याचे दार बंद करून कुलुप ठोकले गोठ्यात १० ते १५ बक-या आहे त्यातील एका बकरीचा बिबट्याने फडशा पाडुन ताव मारायला सुरुवात केली. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असता त्यांनी आमच्या कडे बिबट्याला पकडण्यासाठी काहीच तयारी नसल्याचे सांगितले या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त न केल्यास तो शेतकऱ्यांच्या बाकीच्या बक-या फस्त करण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच त्याला बघण्यासाठी गर्दी होत आहे वरिष्ठ वनअधिकारी यांनी त्वरित बंदोबस्त न केल्यास काहीही अनर्थ घडू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!